कांदा निर्यात बंदीविरुद्ध उमराणे, सटाणा, चांदवडमध्ये शेतकऱ्यांची निदर्शने…

491

नाशिक : कांदा निर्यात बंदीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. कांदा निर्यात बंदीविरुद्ध उमराणे, सटाणा, चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली. तसेच ठिक-ठिकाणी रस्ते अडवून सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. नाशिक घाउक लिलाव सोमवारी बंद ठेवण्यात आला. देशभर कांदा महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे, देशात कांद्याच्या किमती कमी होतील असा हेतू आहे. परंतु, सरकारचा हा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.