शेतकऱ्यांनो, तुमची मुलगी हरलेली नाही…

पोलिसांनी बळजबरी केल्याने गावात तणाव...

569

अहमदनगर : राज्यातील तमाम शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करत, तुमची मुलगी हरलेली नाही, लढाई अजून संपलेली नाही, आता उपोषण मागे घेत आहे, तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्या निकिता जाधव हिने दिला आहे. कर्जमाफी व विविध मागण्यासाठी पुणतांबा गावात बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी पाचव्या दिवशी उपोषण माघारी घेतले आहे. गेल्या पाच दिवसापासून ह्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. ह्या मुलींची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवले. पोलिसांनी बळजबरी केल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर, कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलक मुलींच्या मागण्याची सरकारनं दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असे अश्वसन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाही प्रकरणाची चोकशी करू असे आश्वासन देखील ह्यावेळी कृषी राज्यमंत्री खोतकर यांनी दिले.