“संभाजी भिडे चले जाव” जालन्यात तीव्र निदर्शने; पोलिसांचा लाठीमार.

487

जालना : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंच्या जालन्यातील कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे जालन्यातल्या आर्य समाज मंदिरात संभाजी भिडेंचं मार्गदर्शन शिबीर आयोजत करण्यात आलं आहे. याला शहरातील दलित संघटना आणि संभाजी ब्रिगेडनं कडाडून विरोध केला. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संभाजी भिडेंना विरोध दर्शवण्यासाठी कार्यक्रमच्या ठिकाणी हे कार्यकर्ते जमा झाले होते. आणि तीव्र घोषणाबाजी केली. मात्र याचवेळी आक्रमक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. संभाजी भिडेंना जिल्हाबंदी करावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे.