बोमन इराणीला “फडणवीसी” सरंक्षण; ५ गुन्हे दाखल तरीही अटक नाही: राकेश शेट्टी; पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी.

975

मुंबई : ३०० करोडोंचा घोटाळा मुंबईतील “डिएन नगर” येथे झाला असून रुस्तमजी डेव्हलपर्स विरोधात ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही मुंबई पोलीस रुस्तमजी डेव्हलपर्सचा डायरेक्टर “बोमन इराणी” ह्या विकासकाला अटक करत नाहीत. महाराष्ट्र सरकारच मुंबई पोलिसांवर दबाव आणत आहे. व त्याला अटकेपासून संरक्षण देत आहे. बोमन इराणी ला “फडणवीसी” सरंक्षण प्राप्त झाले आहे असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव राकेश शेट्टी यांनी केला आहे.

३०० पेक्षा अधिक गुंतवणूकदार व जनतेसोबत आर्थिक फसवणूक रुस्तमजी डेव्हलपर्सनी केली आहे. डायरेक्टर बोमन इराणी याच्या विरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. तरीही बोमन इराणीला अटक केली जात नाही. भाजपा सरकार मधील अनेक राज्य व देश पातळीवरील अनेक मंत्र्यांशी व पदाधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळेच पोलीस त्याला अटक करत नाहीयेत असा आरोप राकेश शेट्टी यांनी केला आहे. डीएन नगर मध्ये तब्बल ३०० जनासोबत फसवणूक झाली आहे. सामान्य व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोवर अटक केली जाते. मग हाय प्रोफाइल बोमन इराणी ला अटक का केली जात नाही असा प्रश्न विचारून त्यांनी मुंबई पोलिसांवर देखील संगनमताचे गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा
राज्य सरकारच्या दबावामुळे मुंबई पोलीस बोमन इराणी ला अटक करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस व राज्य सरकार यांची विश्वासार्हता धोक्यात आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएन नगर घोटाळा प्रकरणात हस्तक्षेप करावा, बोमन इराणीला अटक करावी आणि सामान्य गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.