उत्तर महाराष्‍ट्र गारठला….

1094

ओझर- निसर्गाचे चक्र बिघडल्याचा मोठा फटका शेतीला बसला असून, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने द्राक्ष उत्पादकांसह शेतकरीवर्ग धास्तावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले शहर म्हणून निफाड तालुका नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यात ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील एअर ट्राफिक कंट्रोल येथे शनिवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांला 0.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.