भिमजयंती साजरी केली म्हणून जातीयवादी लोकांचा रास्ता रोको, टायर जाळून केला निषेध..

244

सोलापुर : पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत जातीयवादी उन्माद सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यातीलअक्कलकोट तालुक्यातील नागणसुर गावात जातियवादी उन्मादाची घटना समोर आली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला गावातील वेसतून मुख्य प्रवेश द्वारातून घेवून जाण्यास अनेक वर्षांपासून विरोध आहे. यावर्षी देखील विरोध झाला, आंबेडकरी समाजाने प्रशासनावर दबाव आणला, तेंव्हा अटी व शर्ती सह परवानगी देण्यात आली,

पोलिसांनी परवानगी देताना केवळ पाच लोक गावातून जातील अशी अजब अट घातली. आंबेडकरी समाजाने ते ही मान्य केलं आणि ठरल्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन पाच जण पोलीस बंदोबस्तात निघाले. गावातल्या मुख्य प्रवेश द्वारावर येताच उच्चजातीय जातीयवादी लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. जोरजोरात ओरडुन विरोध करायला लागले. शेकडो पोलीसांच्या बंदोबस्तात पाच जणांना घेऊन जाताना पोलीस प्रशासनाची मोठी पळापळ यावेळी दिसली.

यानंतर गावातून फोटो घेऊन पाच जण गेले म्हणून या जातीयवादी लोकांनी टायर जाळून रस्ता रोको करून निषेध केला.

या जातीयवादी घटनेमुळे आंबेडकरी समाजात संताप निर्माण होत आहे. ऑल इंडिया पँथर सेना या संघटनेने या घटनेचा निषेध केला असून ज्यांनी जयंती केली म्हणून निषेध केला अशा देशद्रोही समाजकंटक आतंकवाद्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून त्या गावचा शासकीय निधी बंद केला पाहिजे. रासुका, युएपीए ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल जगभरात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. मात्र उच्च जातीचा माज असलेल्या जातियवादी लोकांमुळे महाराष्ट्र राज्याचे धिंडवडे निघाले आहेत. हा उन्माद वेळीच ठेचायला हवा अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून व्यक्त होत आहे.