संघर्ष दिन : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन..

83

Pune : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध (Pune) उपक्रम राबविण्यात आले. रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनच्यावतीने पीएमपीएल कोथरूड डेपो येथे कामगार बंधू आणि भगिनी यांचे समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय निमंत्रक ॲड. मंदार जोशी यांचे हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

या प्रसंगी जितेश दामोदरे, सैनिक आघाडी अध्यक्ष वसंत ओव्हाळ यांच्यासह रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे नागेश गायकवाड, गणेश कदम,सुभाष पवार, विजय सनेसर, तेजस्विनी वाघमारे, राजेश शिलवांत,दीपक तेली यांचे सह मोठ्या प्रमाणात कामगार पदाधिकारी उपस्थित होते.

येत्या काही दिवसात पुण्यातील सर्व पीएमपीएल डेपो मध्ये रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अधिकृत शाखा आणि बोर्ड अनावरण चंद्रकांत पाटील आणि मा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत, असे ॲड मंदार जोशी आणि नागेश गायकवाड यांनी सांगितले.

मोरे विद्यालय चौक कोथरूड येथे अल्प दरात लायसेन्स कॅम्पचे उदघाटन आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. हर्षवर्धन दिपक मानकर आणि मंदार जोशी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद संघ, बाळासाहेब खंकाळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आले होते.या प्रसंगी अमित तुरुकमारे, मिलिंद खळगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि कार्यकर्ते उपस्थित (Pune) होते.