एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी CM एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सूचना.

152

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे वृत्त आहे. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईला हालविण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Khadse) यांनी एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तातडीने संपर्क साधला होता. त्यानंतर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. खडसे सध्या जळगावात आहेत. त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले.