लो. टिळक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा..

307

Pune : लोकमान्य टिळक यांच्याशी थेट जोडल्या गेलेल्या संस्थेकडून हा पुरस्कार मला भेटतो आहे. त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. याच कारणासाठी मी देशवासीयांना शब्द देतो. मी देशवासीयांच्या मदतीमध्ये, सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहू देणार नाही. हा पुरस्कार मी देशातील 140 कोटी जनतेला समर्पीत करतो. या पुरस्कारापोटी मिळणारी एक लाख रुपयांचा आर्थिक निधी मी नमामी गंगे उपक्रमाला अर्पण करतो, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक स्मारक ट्रस्ट द्वारा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, टिळक ट्रस्टचे दीपक टीळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिळक स्मारक ट्रस्टचे दीपक टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान काही घटना आणि शब्दांत मांडता येणार नाही. आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सांगितले की, माझ्यासाठी हा संस्मरणीय क्षण आहे.