संविधान कोणीही बदलु शकत नाही, बदलण्याचा जे विचार करतील, जनता त्यांनाच बदलुन टाकते – रामदास आठवले

316

मुंबई दि. 29- महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. हे संविधान कोणताही पक्ष, कोणतीही ताकद कधीही बदलवु शकत नाही. तसेच कोणतेही सरकार आले तरी भारताचे संविधान बदलु शकत नाही. ज्यांनी संविधान बदलण्याचा विचार केला त्यांना जनताच बदलुन टाकते असा इतिहास आहे. संविधान बलण्यापेक्षा संविधानाच्या विचारानुसार आपल्यामध्ये बदल घडविला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानातला भारत उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. म्हणून त्यांना आमची साथ आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे येथील मुळशी तालुक्यातील मूळशीखुर्द या गावातील ग्रामपंचायतिच्या नवीन सुसज्ज कार्यालयाचे लोकार्पण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्राचे माजीमंत्री महादेव जानकर, माजी आमदार शरद धमाले, मुळशी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वंदना श्रीकांत कदम, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, श्रीकांत कदम, विक्रम शेलार, वाडेकर, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब ओव्हाळ; सतीश केदारी; विनोद चांदमारे, सुनिल पासलकर, लक्ष्मण भालेराव, केदार धमाले, प्रविण निकाळजे, विजय, बनसोडे, प्रविण गांगुर्डे, अविनाश गांगुर्डे असे आदि मान्यवर उपस्थित होते.

ग्रामसेवक निलीमा अनिल सावंत, बीडीओ संजय धमाळ, नायब तहसिलदार श्रीकांत मिसाळ; तलाठी विवेक अवचारे आदी मान्यवर उपस्थित होते.