मेघमनी फाइनेकेमच्या उत्पन्नामध्ये २७ टक्क्याने वाढ..

137

Mumbai :  मेघमणी फिनकेम लिमिटेड (MFL), भारतातील अग्रगण्य एकात्मिक रासायनिक उत्पादक कंपनीने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने मजबूत ऑपरेटिंग आणि आर्थिक कामगिरी दिली. केमिकल कंपनीने २०२३ च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या उत्पन्नात २०२२ च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही च्या तुलनेत 27% वाढ नोंदवली आहे.

निकालावर भाष्य करताना श्री. मौलिक पटेल; अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मेघमनी फाईनकेम लिमिटेड (MFL), म्हणाले: “आम्ही आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 18% ची भरघोस वाढ पाहिली आहे, परिणामी वार्षिक महसुलात 27% वाढ झाली आहे. या अस्थिर बाजारपेठेतही, आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये भरघोस वाढ पाहिली आहे आणि एकंदर आधारावर देखील वाढ झाली आहे. २०२३ च्या आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत आम्ही सुरू केलेल्या नवीन उत्पादनांनी पी अँड एल मध्ये योगदान देण्यास सुरुवात केली आहे आणि आम्हाला आशा आहे की हे योगदान २०२३ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून वाढेल. डेरिव्हेटिव्ह्ज आणि स्पेशालिटी विभागातील महसूल योगदान २०२३ च्या आर्थिक वर्षा पहिल्या तिमाहीमध्ये 31% पर्यंत वाढले आहे जे २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही मध्ये 25% होते.