भीमसैनिक मनोज गरबाडे वरील कलम 307 मागे; पोलिसांवरील निलंबनही रद्द…

255

Mumbai : चिंचवड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शाईफेकीची घटना घडली होती. समता सैनिक दलाचा भीमसैनिक मनोज गरबडे यांच्यावर कलम ३०७ अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन गृहमंत्रालयावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.

या पार्श्वभूमीवर आता हे कलम मागे घेण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांना दिले आहेत. एबीपी माझा ने याबाबत बातमी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पुण्यातील ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच भीमसैनिक मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ लावण्यात आलं होतं. याप्रकरणी आता खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांवरील निलंबन मागे घेतलं असून भीम सैनिक मनोज वरील कलम ३०७ मागे घेण्यात आलं आहे.