Job Alert : सातारा जिल्हा पोलिस दलात होणार १४५ पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती…

204

Pune : महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. 23-6-2022 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक, सातारा यांचे आस्थापनेवर सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 145 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.

ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि.09-11-2022 ते 30-11-2022 या कालावधीत स्विकारण्यात येतील. या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे.