उद्या मुंबईत पोहोचू, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही : एकनाथ शिंदे

215

Mumbai : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारीच फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी गुवाहाटी येथील मां कामाख्या देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींमध्ये उत्तीर्ण होऊ आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते, असे गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. त्याबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.