मानव अधिकार विषयाच्या जागा निर्धारित करा : नसोसवायएफ

267

नांदेड  : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील शै. वर्षे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पी.एचडी. प्रवेश पूर्व परीक्षा पेटची जाहिरात आपण दि. १३ एप्रिल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. मागच्या अनेक दिवसांपासून मानव अधिकारशास्त्र हा विषय अंतरविद्याशाखेचा असून या विषयातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, व विधीशास्त्राचे मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) विद्यार्थी संघटनेने आज एका निवेदनाद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे मागणी केली आहे.

शै. वर्षे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पी.एचडी. प्रवेश पूर्व परीक्षा पेटची जाहिरातीत आद्यप पर्यंत विद्यापीठाने कुठलाही सकारात्मक निर्णय न घेतल्याचे या जाहिरातीवरून दिसून येते. मानव अधिकारशास्त्र हा राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन व विधीशास्त्राशी जुळणारा विषय असून विद्यापीठांतर्गत सामाजिकशास्त्रे संकुलातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी एम.फील. व पी.एचडी या विषयात पदव्या अवगत केल्या आहेत. पण मागच्या दोन वर्षांपासून या विषयासाठी विद्यापीठ प्रशासनाने मार्गदर्शक उपलब्ध करून देत नाहीत.त्यामुळे या विषयातील नव-संशोधनाचा मार्ग मोकळा होताना दिसून येते नाही.आत्ताची शिक्षण प्रणाली ही अंतरविद्याशाखा प्रणित शिक्षण प्रणाली असून या प्रणालीच्या आधारे विद्यापीठ प्रशासन मानव अधिकारशास्त्रातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शक करण्यासाठी असक्षम दिसून येत आहे.

विद्यापीठाने १३एप्रिल रोजी संकेतस्थळावर जाहिरातीत आवेदनपत्र भरण्यासाठी केवळ १५ दिवसांचाच कालावधी दिला असून हा कालावधी वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आवेदनपत्र भरण्याची तारीख १० मे २०२२ ही करण्यात यावी तसेच आवेदन पत्राच्या संदर्भात आपण जे शुल्क आकारले आहे ते शुल्क अतिअधिक असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क आकारण्यात यावे ही ही मागणी नसोसवायएफ विद्यार्थी संघटनेकडून केली आहे.

खालील मागण्या नसोसवायएफ तर्फे करण्यात आल्या आहेत.

१)मानव अधिकार विषयासाठी

राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन व विधीशास्त्रातील म मार्गदर्शक उपलब्ध करून जागा त्वरित निर्धारित करण्यात याव्या.

२)पेट परीक्षा २०२२चे आवेदन अर्ज दाखल करण्याची मुदत १० मे २०२२ ही करण्यात यावी

३) पेट परीक्षेचे शुल्क खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये शुल्क आकारण्यात यावे.

येत्या ५ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास विद्यापीठाच्या मुख्य बिल्डींग मधील स्वागत कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची असेल असे डॉ.डी.हर्षवर्धन (राष्ट्रीय अध्यक्ष नसोसवायएफ) प्रा.सतीश वागरे (राज्य प्रवक्ता) स्वप्नील नरबाग(राष्ट्रीय अध्यक्ष,फुले शाहू आंबेडकर युवा मंच ,नांदेड)प्रकाश दिपके (मराठवाडा संघटक) डॉ. प्रविण सावंत, मनोहर सोनकांबळे (जिल्हा प्रवक्ता) अनुपम सोनाळे, चंद्रकांत भिसे, गोपाल वाघमारे, जयवर्धन गच्‍चे आदी विद्यार्थी नेत्यांनी स्वाक्षरी असलेले निवेदन मा. कुलगुरूंना समक्ष भेटून दिले आहे.