महिला कर्मचारी अधिकाऱ्यांनी फुले-आंबेडकरी विचारांच्या विरोधी असलेल्या कामगार संघटनेतून बाहेर पडावे- जे एस पाटील

1173
औरंगाबाद  : स्वतंत्र मजदूर युनियन महिला विंग औरंगाबाद यांच्या वतीने मानसी हॉटेल येथे स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे एस  पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली महिला प्रबोधन शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय घोडके, औरंगाबाद महावितरणचे मुख्य अभियंता माननीय भुजंग खंदारे, औरंगाबाद महापारेषणचे मुख्य अभियंता माननीय मिलिंद बनसोडे, डाॅ चेतना सोनकांबळे, डॉ माधुरी सावंत, डॉ जयश्री सोनकवडे,डाॅ रेखा गायकवाड यांनी महिलांना संबोधित करताना महिलांनी फुले-आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
महिला प्रबोधन शिबिराचे अध्यक्ष मुख्य मार्गदर्शक माननीय जे एस पाटील यांनी फुले-आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या महिला कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गानी फुले-आंबेडकरी विचारांच्या विरोधी असलेल्या कामगार संघटनेतून बाहेर पडावे असे आवाहन केले, पाहुण्यांचा परिचय रूपाली पहुरकर यांनी करून दिला. प्रास्ताविक रोहिणी घनबहादुर यांनी केले,सूत्र संचालन नमिता दहाट यांनी आणि आभार प्रदर्शन मयूरी जवडीकर यांनी केले, याप्रसंगी महिलांच्या वतीने एक लाख रुपयाचा निधी स्वतंत्र मजदूर युनियनला माननीय जे एस पाटील साहेबांना सुपूर्द करण्यात आलायावेळी नंदा गायकवाड,सुजाता घोडके,ज्योती खंदारे,गणेश उके, इत्यादी बहुसंख्य महिला कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने महिला प्रबोधन शिबिराला उपस्थित होते.