Big News – नवाब मलिक ED च्या ताब्यात; घरावर छापे…

554

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (Nawab Malik ED Enquiry News)

जाणून घ्या घटनाक्रम (Highlights)

पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले .

त्यानंतर १ तास मलिक यांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केली

चौकशी केल्या नंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय

नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात घेऊन गेले असल्याची माहिती आहे