कविता – अक्षरगंध सावित्रीचा….

778

असमानतेच्या जात्यात
भरडत होतं हो आयुष्य
चार भिंतींत जगण्यातच
बंदिस्त स्त्रियांचं भविष्य

सावित्रीच्या रूपात उभी
परिवर्तनाची तप्त मशाल
ज्योतिंबासह तोडली ती
अज्ञानतेची भिंत विशाल

शिक्षणरूपी सुमनांतुनी
पसरला असा अक्षरगंध
भेदभावात जखडलेला
गळला अमानवीय बंध

रोमारोमात संचारला हा
दरवळला दशदिशांतुनी
ज्ञानबिंदू सजताच हाती
बहरल्या बालिका गुणी

अक्षरगंध माखून भोवती
चढलाय कर्तृत्वाचा घाट
स्वबळावर निर्मीली तिने
यशस्वीतेची आदर्श वाट

आत्मविश्वासानेच झाली
भल्या बुऱ्याची ओळख
जागृत बुद्धी कौशल्याने
केली माणसांची पारख

मताधिक्य नि धाडसाने
केला अन्यायाचा विरोध
आत्मसन्मानाची लढाई
देते आम्हांस प्रखर बोध

सावित्री कमळपुष्पातील
अक्षरगंध ठरलाय प्रेरक
गाव खेड्यात घडताहेत
आज उच्च विद्या धारक

कवयित्री : मीता अशोकराव नानवटकर
सावनेर, नागपूर
9823219083

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com