Corona Vaccination बाबत भारताने रचला नवा विक्रम; पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती…

305

नवी दिल्ली 28 ऑगस्ट : कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) ओसरत आहे. दरम्यान आता कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) बाबतीत देशानं शुक्रवारी एक नवा विक्रम रचला आहे.

शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

पंतप्रधान म्हणाले, की आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झाले आहे. या यशासाठी लस घेणाऱ्या आणि या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांचं अभिनंदन.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सर्वाधिक कोरोना लसीकरण उत्तर प्रदेशात (Vaccination in Uttar Pradesh) झाले आहे.

शुक्रवारी तिथे तब्बल 28 लाख 62 हजार जणांनी लस घेतली. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे. इथे 10 लाख 79 हजार जणांनी शुक्रवारी लस घेतली. केंद्रानं ऑगस्टमध्ये दररोज 1 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 14 कोटीहून अधिक लोक असे आहेत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

देशात सध्या कोव्हॅक्सिन (Covaxin), कोविशिल्ड (Covishield vaccine) आणि स्पूतनिकची (Sputnik V) लस दिली जात आहे. पुढच्या महिन्यापासून जायडस कॅडिलाची लसही 12 वर्षावरील सर्व लोकांना देण्यास सुरुवात केली जाईल.