#CoronaUpdate : सांगली-कोल्हापूर कोरोनाचे टेंन्शन कायम; प्रशासनासमोर आव्हान…

254

मुंबई : राज्यात कोरोना दुसरी लाट कमी होत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात आज 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.