#CoronaUpdate : महाराष्ट्रात आज ८ हजार २९६ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद; तर ६०२६ रुग्ण कोरोनामुक्त…

795

मुंबई (१० जुलै) : राज्यात आज 8 हजार 296 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 06 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.