ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात ED कडे तक्रार…

306

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (minister Nitin Raut) यांच्याविरोधात ईडीकडे (ED) तक्रार करण्यात आली आहे. नागपूर येथील वकील तरुण परमार (adv Tarun parmar) यांनी ही तक्रार केली असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी या केला आहे. (adv tarun parmar filed complaint against minister nitin raut to ED)

वकील तरुण परमार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात देखील तक्रार केली होती. यावेळी त्यांनी अनिल देशमुख, नागपुरातील एक मंत्री, त्यांचे सचिव आणि अन्य मोठ्या अधिकाऱ्यांचा मनी लाँडरींग प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे म्हटले होते. अनिल देशमुख यांच्यासोबत आणखी काही नेत्यांविरोधात मनी लाँडरींगच्या प्रकरणामध्ये पुरावे असल्याचा दावा तरुण परमार यांनी ईडीकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. याचवेळी त्यांनी डॉ. नितीन राऊतांची तक्रार केली असावी, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये मनी लाँडरींग प्रकरणात पुरावे असल्याचा दावा या वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांसह डॉ. नितीन राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.