लढाऊ कामगार नेते भाई प्रकाश वागरे आज सेवानिवृत्त…

512

नांदेड : दि. ३० – तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर विज वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य मर्या. तुन कामगार नेते भाई प्रकाश वागरे निवृत्त होत आहेत. शिस्त,कार्यकुशलता,अमोघ वक्तृत्वशैली, लढवय्येपणा याच्या जोरावर कामगारांच्या अन्यायाला न्याय मिळवून देणं. प्रशासनाशी उत्तम हाताळणी, कामगार कायद्याची जाणं असणारे नेते हे वयाच्या साठाव्या वर्षी यशस्वी सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत आहेत.

उत्तम संघटन कौशल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुखं दुःखाच्या जाणीवेमुळे त्यांची नांदेड झोनच्या अध्यक्ष पदी निवड झाली.
त्यात त्यांनी सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.असा बहुचर्चित कामगार नेता आज सेवानिवृत्त होत असताना महाराष्ट्रातुन त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरुवातीला कॉ. दत्ता देशमुख यांच्या वर्कर्स फेडरेशन मध्ये काम केले. त्यानंतर सन 1988 च्या सुमारास भाई वागरे यांनी नांदेडमध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची स्थापना केली. स्थापने नंतर पहिले माविकस चे अधिवेशन हे कलामंदिर,नांदेड येथे घेतले,त्यावेळी मुख्य अभियंता रंगारी, जे. एस. पाटील व प्रमुख पाहूणे म्हणून सुरेशदादा गायकवाड हे उपस्थित होते.
भाई वागरे यांनी मविकस मध्ये कार्यकर्ता पातळीपासून कामाला सुरुवात केली. ते आज नांदेड झोन म्हणजे नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यांचे संघटनेचे प्रमुख आहेत. कामं अडलेल्यांचे हिरहिरीने कामे करणे.एम.एस.इ.बी च्या खासगीकरणा विरुद्धच्या प्रत्येक लढ्यामध्ये भाई वागरे यांनी कामगारांचे नेतृत्व केले. पदोन्नतीतल आरक्षण संदर्भात जंतर-मंतर,नवी दिल्ली, आझाद मैदान, मुबई. नागपूर विधानभवन असे अनेक मोर्चे त्यांच्या कार्यकाळात केले. तसेच मयत कामगार वारसांना नौकरीवर घेणे, न्यायीक बाबींमध्ये कामगारांसाठी अनेक आंदोलने केली आणी सर्वच्या सर्व आंदोलने ही यशस्वी झाली. त्यामुळे अनेक मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळाल्या,अनेक जणांचे निलंबन बडतर्फी मागे घेण्यात आली,अनेकांना रोजगार मिळाला, असंख्य लोकांच्या घरी चूल पेटली, त्यांच्या आशीर्वादामुळे भाईंचे आजपर्यंत चे जीवन आणि नोकरी सहजपणे पार पडली आहे. संघटना व सामाजिक काम करण्याआधी त्यांचे प्राधान्य नोकरीला आहे. आधी नोकरी म्हणजे कर्तव्य आणि मग बाकीचे काम हे तत्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले. त्यामुळे 40 वर्षात त्यांना एकही नोटीस मिळालेली नाही हे विशेष. त्यामुळे त्यांना म.रा.विद्युत कंपनी मर्या.नांदेड परिमंडळ उल्लेखनीय कामगिरी प्रशस्तिपत्र ही अनेक वेळा मिळाले. जेव्हा वीज कर्मचारी पतसंस्था,नांदेड ६० कोटी रूपयाच्या पतसंस्थेत संचालक म्हणून ५ वर्ष आणी ५ वर्ष पतसंस्था उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्विकारला. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना न्यायीक लाभ देण्याचे काम त्यांनी केले. पतसंस्था १०० कोटीची झाली तेव्हा संघटनेचे पँनल प्रमुख म्हणून पतसंस्थेत जास्त सदस्य निवडून आणले व पतसंस्था ताब्यात घेतली.

नोकरी व माविकस चे काम केल्यावरही त्यांनी सम्यक आंदोलन आणि दलित सेनेसोबत अन्न दान व रक्त दान शिबीर अशी अनेक सामाजिक कामे केली आहेत. सम्यक आंदोलन मध्ये प्रफुल्ल सावंत व दिगंबर ढोले तर दलित सेनेसोबत प्रा. गौतम दुथडे हे त्यांचे सहकारी होते. भाई वागरे यांनी आपल्या आयुष्यात १९८३ पासून रक्तदान करण्यास सुरूवात केली ते आजतागायत सुरूच आहे. ३०० चे वर त्यांनी स्वतः रक्तदान केले आहे.

कामगार चळवळीतील भरीव योगदाना बद्दल राज्य सरकारचा गुणवंत कामगार पुरस्कार भाई प्रकाश वागरे यांना मिळाला आहे. भाई प्रकाश वागरे म्हणजे वीज कंपनीतील कामगार चळवळीचा अग्रगण्य नेता. हल्लाबोल च्या घोषणांनी विद्युत भवन परिसर दणाणून सोडणारा नेता असा हा हल्लाबोल करणारा नेता आज दिनांक 31 मे रोजी वीज कंपनीच्या सेवेतून निवृत्त होत आहे, असे असले तरी माविकस, कामगार चळवळ आणि सामाजिक कार्यातुन ते पुढे आणखीन चमकणार आहेत.

व्यक्त व्हा बिनधास्त… लेख, ब्लॉग लिहा, आम्ही प्रकाशित करू…
www.YuvaPrabhav.Com
आपले लेख, ब्लॉग मेल करा : yuvaprabhav@gmail.com