आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे यांचे निधन…

290

नागपूर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, लेखक, समिक्षक व विचारवंत प्रा. सतेश्वर मोरे यांचे काल सायंकाळी नागपूर येथील न्यूक्लियस रुग्णालयात निधन झाले. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते कोरोना या आजाराशी लढत होते.

१५ जूलै १९६२ त्यांचा जन्म झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते वलगाव येथील आपल्या मामाकडे आले. तेथून त्यांनी आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेत असतानाच कविता, नाट्य व वादविवाद या स्पर्धेतून ते नावारुपास आले व पुढेल त्यांनी एम.ए. केल्यानंतर बडनेरा येथील आरडीआयके महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते पँथर या सामाजिक संघटनेत सहभागी झाले. तेथूनच त्यांच्यामध्ये विद्रोही कवी नावरुपास आला. पुढे संबोधी, डॉ. आंबेडकर स्टडी सर्कलशी जुळल्यानंतर अमरावतीमधील साहित्य व सांस्कृतिक चळवळीला त्यांचे मोठे योगदान लाभले.

‘आंबेडकरी साहित्य’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्याची संकल्पना रुजविली. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलने घेऊन आंबेडकरी साहित्य चळवळ उभी केली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी साहित्य चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.