नवे रेडीरेकनर दर : मुंबई स्वस्त तर पुणे महाग ! पुण्यात मुंबई पेक्षा जास्त नोंदणी मूल्य

568

पुणे : राज्यात शुक्रवारपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू करण्यात आले असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक यांनी दिली आहे, राज्यात मुंबई हे केवळ एकमेव शहर असेल जिथे रेडी रेकनर घटवण्यात आला आहे तर पनवेल महापालिका क्षेत्र हे राज्यात सर्वाधिक वाढ असलेले क्षेत्र आहे. तर जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक वाढ करण्यात आलेला जिल्हा आहे.

रेडी रेकनरचे दर ठरवताना मुंबईत रेडी रेकनर दरामध्ये 0.6 टक्क्यांनी घट करण्यात आली तर पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 3.91 टक्के वाढ केली गेली. गेल्या वर्षी झालेल्या दस्तांची नोंदणी मिळालेला महसूल या आकडेवारीवरून ठरलेल्या प्रमाणानुसार ही वाढ अथवा घट करण्यात आल्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी सांगितले.