#CoronaCrisis : मुंबईत मृतांचा आकडा सहा हजारावर..

331

मुंबई : राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजही अनेक शहरात टाळेबंदी आहे. देशाची आर्थिक राजधानी व राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत करोनाचा फैलाव जलदगतीने होत आहे. मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा लाखाच्या पुढे गेला असून, आतापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत आतापर्यंत चार लाख ७० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २३ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ६६ दिवसांवर पोहोचला आहे.

शनिवारी दिवसभरात मुंबईत १,०९० बाधितांची नोंद झाली, तर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत असला तरी मृत्युदर अद्याप खाली आलेला नाही. मुंबईत आतापर्यंत ६०३३ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर सध्या ५.५ टक्के इतका आहे.

लेख,बातम्या, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी yuvaprabhav@gmail.com वर मेल कराव्यात.
योग्य व उत्कृष्ट लिखाणास YuvaPrabhav.com ह्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील… (संपादक)