#CoronoCrisis || दिलासादायक बातमी ; राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे होवून घरी परतले..

391

मुंबई || आज राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही व राज्यातील जनतेला देखील दिलासादायक ही बातमी आहे.आज जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.