#Lockdown : रेड झोन मध्ये उद्यापासून दारू विक्री; प्रतिबंधित क्षेत्र वगळून मुंबई – पुण्यातही दारू विक्रीला परवानगी…

1066

केंद्र सरकारने शुक्रवारी लॉक डाऊन १७ मेपर्यंत म्हणजे दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा केली. ,ग्रीन व ऑरेंज क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज क्षेत्रांमध्ये सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस परवानगी देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले आहे.

तिन्ही क्षेत्रातील दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.