अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी, वरिष्ठ पोलिस अधिकारी निशिकांत मोरे निलंबित…

526

नवी मुंबई :: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश गृह विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. निशिकांत मोरे सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पुणे येथील ट्रान्सपोर्ट विभागात डीआयजी असलेले निशिकांत मोरे यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. जून महिन्यात या मुलीचा वाढदिवस होता. निशिकांत मोरे आणि मुलीचे कुटुंबीय एकमेकांचे ओळखीचे असल्याने मोरे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करायला गेले होते. केक कापल्यानंतर मोरे यांनी या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता.

पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी १७ वर्षीय मुलगी सोमवारपासून बेपत्ता आहे. घरातून बेपत्ता होणापूर्वी या मुलीने एक सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये तिने पुण्याचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्यामुळे आपण आत्महत्या करतो आहोत असे या मुलीने या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. २६ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निशिकांत मोरे यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.