मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी २२ जानेवारीला.

360

मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली असून आता पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे आदेश रजिस्ट्रार यांना दिले आहेत.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाच्या बाजूनं न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मराठा आरक्षण देतेवेळी घटनापीठाने घालून दिलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचां मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षण विरोधात याचिका करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या मदतीसाठी कायदेतज्ज्ञांची एक टीमही नियुक्त करण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निकाल काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

http://mahindra-happinest.project-info.in/?d=OTgzMzYxODA4NQ==