… तर देशात धार्मिक हुकूमशाही येईल : प्रकाश आंबेडकर.

563

गोंदिया : देशात पुन्हा मोदीची सत्ता आली तर, वेगळ्या प्रकारची धार्मिक हुकूमशाही येण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत वंचित राहिलेल्या समूहाला मान,सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व्यवस्था आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. आरएसएस व भारतीय जनता पक्ष हे धार्मिक हुकूमशाहीचे प्रतीक आहेत. ही हुकूमशाही लादली जात आहे. हे सरकार परत आले तर तुम्हाला हे कैदी केल्याशिवाय राहणार नाही. नोकरी संपविली जात आहे, तुम्हाला कामगार करून ठेवण्याचे यांचे धोरण आहे असे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडी व भारिप चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. गोंदियातील भीमनगर मैदानात गुरुवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये घेणार, अशी केवळ घोषणा करून चालणार नसून काँग्रेसतर्फे तसा मसुदा द्यावा, अशी मागणी आपण केली होती. मात्र, अद्याप यावर काँग्रेसतर्फे कुठलाही निर्णय न घेतल्याने आगामी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे स्वबळावर लढणार आहे. असे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.