मालेगावात “वंचितां”चे वादळ, आंबेडकर आणि ओवेसी यांची जाहीर सभा..

649

मालेगाव : वंचित बहुजन आघाडी च्या राज्यभरात जाहीर सभाचा झंजावात राज्यभर सुरू असून, त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगावात हे वादळ धडकणार आहे. १३ फेब्रुवारीला ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भारीप बहुजन महासंघाचे खासदार प्रकाश आंबेडकरांची संयुक्त सभा होत येथे होत आहे. ह्या सभेकडे सर्वच राजकीय विश्लेषकाचे लक्ष लागले आहे. मालेगाव येथे मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

मालेगाव येथील पोलिस कवायत मैदानावर दुपारी साडेतीनला ही जाहीर सभा होईल, माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या सभेला अहमदनगर, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार यासह राज्यातील कार्यकर्ते येणार आहेत. आमदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार विजय गोरे, माजी आमदार डॉ. दशरतांडे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीतर्फे भारिप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.