मूळ वेतन 23 टक्क्यांपर्यंत वाढणार, जानेवारीपासून सातवा वेतन आयोग

930

मुंबई- येत्या जानेवारीपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात अाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढीव वेतनाचे लाभ हाती पडणार अाहेत. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी व सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा वेतन आयोग लागू हाेईल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर २४,७८५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.