रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार..

132

Mumbai : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ डिसेंबरला वाढदिवस आहे. हा दिवस रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दरवर्षी संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त गरिबांना मोफत अन्न, वस्त्रचे वाटप तसेच समाजातील गरजू विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. वैद्यकीय मदत, महिलांना साडीवाटप असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. तसेच विविध जिल्‍ह्यांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक रुग्णालयांमध्ये मोफत फळे व बिस्कीटवाटप करण्यात येणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्याचे पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी आवाहन केले आहे. या वेळी रिपाइंचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, अरुण पाठारे, विजय साबळे, अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.