माफसू येथे भारतीय संविधान दिन साजरा..

73

नागपुर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मुख्यालयी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला अभिवादन व संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाला संचालक संशोधन व कुलसचिव डॉ नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण व अधिष्ठाता निम्नशिक्षण डॉ अनिल भिकाने, अधिष्ठाता मत्स्यविज्ञान डॉ सचिन बोन्डे, परीक्षा नियंत्रक डॉ भूषण रामटेके, उपकुलसचिव (आस्था) डॉ अजय गावंडे, उपकुलसचिव (शिक्षण) डॉ जितेंद्र वाघाये, मा कुलगुरू महोदयांचे खाजगी सचिव डॉ वकार खान, मा कुलगुरू महोदयांचे तांत्रिक अधिकारी डॉ अतुल ढोक, तांत्रिक अधिकारी (सामान्य) डॉ गिरीधर शेंडे, तांत्रिक अधिकारी पशुविज्ञान शाखा व अध्यक्ष, कास्टट्राइब माफसु कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) डॉ प्रज्ञेय ताकसांडे, सहाय्यक नियंत्रक (वित्त) रामराव कीर्तने, सहाय्यक कुलसचिव महेश आंबोकर, संचालक विस्तार शिक्षण यांचे स्वीय सहाय्यक व उपाध्यक्ष, कास्टट्राईब माफ़सू कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) प्रवीण बागडे, भंडारपाल विशाल पिल्लारे व वरिष्ठ लिपिक व कोषाध्यक्ष, कास्टट्राईब माफ़सू कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) संतोष बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.