मराठा आरक्षण आंदोलन चिघळले, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या..

113

बीड : मराठा आरक्षण आंदोलन चिघळले असून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली आहे. मराठा आंदोलकांकडून मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. परंतु आता थेट मराठा आंदोलक नेत्यांची घरं टार्गेट करीत आहेत. त्यानंतर त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत.

दोन दिवसापुर्वी आंदोलकांनी तहसिलदाराची गाडी पेटवून दिली होती. तर महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील आंदोलकांकडून पेटवून देण्यात आल्या आहेत. यातच मराठा आरक्षणावर काहीही बोलत नसल्याने मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. यातच पार्कींगमध्ये असलेल्या सर्व गाड्या देखील मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच ते सहा गाड्या फोडल्या गेल्या आहेत.

दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. परंतु आंदोलकांनी तीव्र आक्रमक केल्याने पोलिसांना देखील काही करता आलं नाही. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलचं पेटलं गेलं आहे.